• भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयात मराठी मजकुराचा इंग्रजी अनुवाद करण्यासाठी शासनाने मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र.नामिका-2017/प्र.क्र.83/भाषा-2 दि.25.01.2018 अन्वये भाषा तज्ञांची नामिका (पॅनल) स्थापन केली आहे.

प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक 201801251623056133 असा आहे.

  • भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयात राज्यातील प्रशासकीय विभाग व इतर शासकीय कार्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या ऊर्दू मजकुराचा इंग्रजी / मराठी अनुवाद करण्यासाठी शासनाने क्रमांक एलएनजी 1003/1733/प्र.क्र.08/2004/20-ब, दिनांक 23 मार्च, 2005 च्या शासन निर्णयान्वये ऊर्दू तज्ञांची एक नामिका (पॅनल) स्थापन केली आहे व सदर नामिकेत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक एलएनजी-2006/1062/प्र.क्र.01/07/20-ब, दि.23 ऑक्टोबर, 2007 अन्वये आणखी एक नाव समाविष्ट करण्यात आले आहे.

प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक 20071023163902001 असा आहे

भाषा संचालनालयाच्या कामाच्या संदर्भात इतर कोणतीही माहिती, आवश्यक असल्यास, वेळोवेळी, समाविष्ट करण्यात येईल.

याकार्यालयाच्यावेबसाईटचापत्ता https://directorate.marathi.gov.in/ असा आहे.